जिल्हा परिषद, पंचायत समिती स्वबळावर लढू आणि जिंकू : आमदार अब्दुल सत्तार

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : सिल्लोड मतदारसंघात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष स्वबळावर लढवणार असून जनतेच्या पाठबळावर त्या जिंकू, असा ठाम विश्वास आमदार अब्दुल सत्तार यांनी भराडी (ता. सिल्लोड) येथे व्यक्त केला. ते भराडी येथील नॅशनल शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, पक्षाने आतापासूनच तयारीला सुरुवात केली असून बूथनिहाय संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात आहे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाच्या मुद्दधांवर निवडणूक लढवली जाईल. स्थानिक पातळीवरील कामगिरी आणि जनतेशी असलेला थेट संपर्क हीच आमची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले, यावेळी त्यांनी कार्यकत्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन करत सांगितले की, विरोधकांकडे केवळ टीका करण्याचे राजकारण आहे, तर आमच्याकडे विकासाचे ठोस काम आहे. शेतकऱ्याच्या अडीअडचणी सोडवण्यासह सर्वांगीण विकास आणि जनतेने केलेल्या विश्वासाला शिवसेनेचा उमेदवार तडा जाऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भराडी गटातून गणेश ढोरमारे यांची उमेदवारी जाहीर : 
या कार्यक्रमात आमदार अब्दुल सत्तार यांनी भराडी गटातून मोढा खुर्द येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील गणेश ढोरमारे या युवकाची उमेदवारी जाहीर केली. त्यास माजी जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी अनुमोदन दिले. महाजनांचे काम उल्लेखनीय यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी माजी जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या कारकिर्दीत झालेल्या कामांची प्रशंसा केली. दरम्यान भराडी गटातून आमदार अब्दुल सत्तार यांनी दिलेले उमेदवार गणेश ढोरमारे यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडणूक आणण्यासाठी महाजन परिचार व भराडी सर्कल मधील कार्यकर्ते कमी पडणार नाही अशी ग्वाही माजी जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी आपल्या भाषणात दिली. याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाळे, माजी जि. प. अध्यक्ष श्रीराम पा. महाजन, माजी सभापती रामदास पालोदकर, कृउबा समितीचे उपसभापती संदीप राऊत, संचालक दामूअण्णा गव्हाणे, नानासाहेब रहाटे,

भव्य नागरी सत्कार 
कार्यकर्ता मेळावा
तालुका सहकारी जिनिंग प्रेसिंगचे व्हाईस चेअरमन अनिस पठाण, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन नरेंद्र (बापू) पाटील, संचालक राजेंद्र ठोंबरे, प्यारेलाल जैस्वाल, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल, नगरसेवक सुधाकर पाटील, डॉ. संजय जामकर, माजी जि. प. सदस्य कौतिकराव मोरे, राजू बाबा काळे, आयबाज शेख, अब्दुल करीम, फकिरा पठाण यांच्यासह सरपंच पप्पू जगनाडे, उपसरपंच गजानन महाजन, आरिफ शेख, मयूर अग्रवाल, विष्णू महाजन, बाळू महाजन, दिनकर गोरे, पंढरीनाथ खोमणे, आसिफ पठाण, सरपंच लक्ष्मण जगताप, पंढरीनाथ चाचे, गणेश काकडे अंयुक चाचे, माधवराव साळवे, 

रघुनाथ साळवे, नानासाहेब गायकवाड, पोपटराव साळवे, प्रकाश साळवे, डॉ. दिनेश साळवे, डॉ. अनिल साळवे, संजय राकडे, दत्ताज्य राकडे, पंढरी राकडे, विठ्ठल राकडे, भाऊसाहेब निकम, मोहम्मद पटेल
सुखदेव शेळके, गोविंद शिरसाट, कौतिक शिरसाट, आजिनाथ गोंगे, जगन्नाथ काकडे, दुर्गादास काकडे, रामकृष्ण काकडे, रविंद्र काकडे, अजिनाथ काकडे, दत्ता काकडे, लक्ष्मण कल्याणकर समाधान साळवे नसीर पटेल रसूल पटेल दिनेश सुरडकर, सागर सुरडकर, धम्मपाल सुरडकर, रवी सुरडकर, कृष्णा मुरकुटे, संजय महाकाळ, काशिनाथ बोरसे कोंडीबा शेळके, अनिल काळे, त्रिंबक काळे, काकासाहेब काळे गजानन वाघ, लक्ष्मण ठोंबरे, बाजीराव ठोंबरे, सागर राजपूत, सांडू राजपूत, कपूरचंद राजपूत, गोटू नाईक, संभाजी हावळे, दीपक हावळे यांच्यासह भराड़ी सर्कल मधील आजी-माजी लोकप्रतिनिधी, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.